पान मसाला, तंबाखू आणि गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना १ एप्रिलपासून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. जीएसटी कौन्सिलकडून एक नवीन ॲडव्हायजरी जारी करण्यात आली असून त्यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जीएसटीने जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार, तंबाखू उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना 1 एप्रिलपासून त्यांच्या पॅकिंग मशीनची जीएसटी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागेल. तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीने जीएसटी अधिकाऱ्यांकडे पॅकिंग मशिनरी नोंदणी न केल्यास तिला एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
सरकारच्या या पावलाचा उद्देश तंबाखू उत्पादन क्षेत्रातील महसुलाची गळती थांबवणे हा आहे. वित्त विधेयक, 2024 ने केंद्रीय GST कायद्यामध्ये सुधारणा सादर केल्या आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की तेथे नोंदणी न केलेल्या प्रत्येक मशीनवर 1 लाख रुपये दंड आकारला जाईल.
जीएसटी कौन्सिलच्या शिफारशीच्या आधारे, कर अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी तंबाखू उत्पादकांकडून मशीनच्या नोंदणीसाठी विशेष प्रक्रिया सुरू केली. सध्याची पॅकिंग मशीन, नव्याने बसवलेल्या मशीन्ससह या मशीन्सच्या पॅकिंग क्षमतेचा तपशील फॉर्म GST SRM-I मध्ये द्यावा लागेल. मात्र, गेल्या वर्षी यासाठी कोणत्या प्रकारचा दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यात आली नव्हती.
Edited by -Ratnadeep Ranshoor