Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केबीसी मधून फोन २५ लाख रुपयांचा जॅकपॉट आणि लाखो रुपयांची फसवणूक

केबीसी मधून फोन २५ लाख रुपयांचा जॅकपॉट आणि लाखो रुपयांची फसवणूक
, गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:22 IST)
कोणत्याही फसवणूकसाख्या फोन वर, ईमेलवर विश्वास ठेवू नका असे पोलीस नेहमीच सांगतात. मात्र तरीहि नागरिक विश्वास ठेवतात आणि आर्थिक मोहाला बळी पडतात व नुकसान करवून घेतात, असाच प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती या शोच्या नावाखाली भामट्याने एकाला आर्थिक गंडा घातल्याची घटना घडली आहे.
 
मूळचा बिहार यथील दरभंगाचा रहिवासी असलेला 15 वर्षाचा मनीष देवेंद्र सध्या मुंबई येथील नालासोपारा येथे वास्तव्यास आहे. त्याला 1 ऑगस्ट रोजी  एका अनोळखी इसमाचा फोन आला, त्या फोनवरुन त्याला कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून 25 लाखांचा जॅकपॉट लागला असे सांगण्यात आले होते, त्यासाठी तुम्हाला 25 हजार आगाऊ भरावे लागतील असे कळवले. तरुणाने विश्वास ठेवत ही घटना तरुणाने आपल्या आईला सांगितली आणि त्यांनी दिलेल्या बँक खात्यात त्याने पैसे पाठवले. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला 1 सप्टेंबर रोजी फोन आला आणि जीएसटी आणि इतर प्रोसेसिंग फीसाठी 60 हजार रुपये पुन्हा मागितले गेले, तेही त्याने भरले बँकेत भरले. काही पैसे त्याने आपल्या गावातून भरले. असे करत या टोळीने लॉटरीच्या नावाखाली त्याच्याकडून जवळपास 3 लाख 92 हजार रुपये उकळले होते. मात्र जेव्हा पैसे भरल्यानंतरही 25 लाख मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर त्याने आलेल्या नंबरवर संपर्क केला. पण समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केले. टीव्ही कार्यक्रमाच्या नावाखाली नागरिकांना फोन करुन पैशाचे अमिष दाखवले जाते. त्यात नागरिकांची फसवणूक होते. त्यामुळे प्रत्येकाने असे फोन आल्यास सावध राहा, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस