Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पीएम मोदींच्या जीवाला धोका, NIA च्या मुंबई ब्रांचला धमकी देणारं ई-मेल

webdunia
, शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (15:21 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका आहे. असा दावा नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजेंसीच्या मुंबई ब्रँचने केला आहे. एनआयएला एक धमकी देणारा ईमेल प्राप्त झालं आहे ज्यात पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या बातमीनंतर एआयए अॅक्शनमध्ये असून या ईमेलची डिटेल दूसर्‍या एजेंसींना पाठवण्यात आल्या आहे.
 
मोदींना जीवे मारण्याचा कट असल्याचे कळून आले आहे. या ईमेलमध्ये धमकी देणार्‍याने 20 किलो RDX असण्याचा दावा देखील केला आहे. या ई-मेल नंतर सुरक्षा एजेंसी अलर्टवर आहे. एनआयएने या मेलची माहिती इतर सुरक्षा एजेंसींसोबत शेअर केली आहे. हेच नव्हे तर एनआयएकडून हायलेव्हल तपास देखील सुरु आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या मुंबई शाखेला पीएम मोदींच्या हत्येचा कट रचण्याचे धमकीचे पत्र मिळाले होते. या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्यांनी 20 किलो आरडीएक्सद्वारे पीएम मोदींना मारण्याची चर्चा केली होती. या मेलमध्ये दोन कोटी लोकांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र, या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि ते कुठून पाठवले आहे, याचा तपास सुरू आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यासाठी 20 स्लीपर सेल तयार असल्याचा दावा देखील केला जात आहे. 
 
याआधीही अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक: अवघ्या ४५ मिनिटात अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला!