Publish Date: Fri, 11 Feb 2022 (15:49 IST)
Updated Date: Sat, 08 Oct 2022 (15:29 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे निवडणूक रॅली घेत म्हटले की उत्तराखंडच्या लोकांना माहित आहे की केवळ भाजप सरकारच या दशकाला उत्तराखंडचे उज्ज्वल दशक बनवू शकते. ते म्हणाले की आता उत्तराखंडने विकासाच्या शिखराकडे वाटचाल केली आहे, उत्तराखंडला नवी ओळख मिळत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानातही भाजपसाठी प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.
काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवत ते म्हणाले की, आमचे सरकार 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या संकल्पाने काम करत आहे. पण आमचा विरोध करणार्यांचे सूत्र आहे - 'सगळ्यांना फाटा, मिळून लुटालूट करा'! संपूर्ण देशात काँग्रेसचे धोरण हेच आहे.