जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली असून भारत १०० व्या स्थानावर घसरला आहे. उत्तर कोरिया, बांगलादेश, इराक या देशांमधील स्थितीदेखील भारतापेक्षा उत्तम आहे. मागील वर्षी
जागतिक भूक निर्देशांकात भारत ९७ व्या स्थानावर होता. यंदा भारताच्या स्थानात तीन स्थानांची घसरण झाली. गेल्या ३ वर्षांमध्ये भारताची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. २०१४ मध्ये ५५ व्या स्थानावर आलेला भारत आता १०० व्या स्थानावर आला आहे.
जागतिक भूक निर्देशांकाची आकडेवारी तयार करताना एकूण ११९ देशांमधील स्थितीचा अभ्यास करण्यात आला होता. दक्षिण आशिया प्रांताचा विचार केल्यास भारताची स्थिती केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या तुलनेत चांगली झाली आहे. इतर सर्व देश भारतापेक्षा पुढे आहेत. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने ही आकडेवारी जाहीर केली आहे.