Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

7 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

7 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार
नवी दिल्ली , सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (12:54 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत घटनेतील जम्मू काश्‍मीरसंबंधी असणारे कलम 370 हटवण्याची शिफारस केली. त्यानुसार तात्काळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या शिफारसीला मान्यता दिली आहे. दरम्यान, सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर विरोधकांनी याचा तीव्र निषेध व्यक्‍त केला आहे. या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ते देशाला संबोधित करणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारकडून घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयावर देशाला संबोधित करणार आहेत. या अगोदर ते सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच सर्व खासदारांसोबत पंतप्रधान आणि अमित शहा बैठक घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसामसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह चर्चा करणार असल्याचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन जहाजं बुडून फिलिपिन्समध्ये 31 जणांचा मृत्यू