रामलीले दरम्यान तुरुंग कर्मचाऱ्यांच्या व्यस्ततेचा फायदा फरार कैद्यांनी घेतला आहे. तसेच कारागृहात उपस्थित असलेल्या दोन पायऱ्यांना कपड्याने बांधून भिंतीला जोडून तेथून कैद्यांनी पळ काढला असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार रामलीला कार्यक्रम दरम्यान तीन कैद्यांनी उत्तराखंडमधील तुरुंगातून पळून जाणायची योजना बनवली. तसेच त्यापैकी दोन कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले. तर एक कैदी तुरुंगाच्या भिंतीवर चढण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाला आणि शिडी घसरल्याने तो पळून जाऊ शकला नाही. तर इकडे कारागृहातून दोन कैदी पळून गेल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. तसेच फरार कैद्यांना पकडण्यासाठी 10 पथके तैनात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीच्या देखरेखीची जबाबदारी पोलिस अधीक्षक स्वतंत्र कुमार सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हरिद्वार जिल्हा कारागृहातून पळून गेलेल्या दोन कैद्यांनी तिसऱ्या कैद्यासोबत ही योजना आखली होती, ज्यांनी त्यांच्यासोबत तुरुंगाची भिंत फोडण्याचाही प्रयत्न केला, पण ती योजना अयशस्वी झाली.
दोन दिवसांपूर्वी कारागृहातून फरार झालेल्या दोन कैद्यांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. फरार कैद्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी आणि प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तर या घटनेमुळे तुरुंग अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर अधिकारींनी सहा तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
Edited By- Dhanashri Naik