Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकनमुळे करोना पसरतो अशा आशयाचे खोटे व्हिडिओ यू ट्यूबवरील टाकले 'त्या ’ फेक व्हिडिओंचा पुणे पोलिसांनी लावला छडा

चिकनमुळे करोना पसरतो अशा आशयाचे खोटे व्हिडिओ यू ट्यूबवरील टाकले 'त्या ’ फेक व्हिडिओंचा पुणे पोलिसांनी लावला छडा
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चिकनमुळे करोना पसरतो अशा आशयाचे खोटे व्हिडिओ अपलोड करून, कुकुटपालन उद्योगाच्या कोट्यावधींच्या नुकसानास जबाबदार असलेल्या यू ट्यूबवरील त्या व्हिडिओंच्या सूत्रधारांचा पुणे पोलिसांनी छडा लावला आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधुन हे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे समोर आले असल्याची माहिती पुणे पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
 
याबाबत बोताना रविंद्र शिसवे म्हणाले, दोन यू ट्यूब चॅनलवरून काही व्हिडिओ अपलोड झाले आहेत. यामध्ये चिकनमुळे करोना पसरतो अशा प्रकारची चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे कुकटपालन उद्योगाचे जवळपास साडेसहाशे कोटी रुपायांचे नुकसान झाले. यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयातील उपायुक्त यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या योग्य त्या परवानगीने त्याचा तपास सुरू करून आम्ही ते दोन यू ट्यूब चॅनल जिथून अपलोड करण्यात आले होते व ज्या व्यक्तींकडून अपलोड करण्यात आले होते, त्यांचा शोध घेतला. त्यांना शोधून काढण्यात आम्हाला यश आलं. एक व्हिडिओ उत्तर प्रदेशमधून एका १६ वर्षीय मुलाने अपलोड केलेला आहे. तर दुसरा व्हिडिओ हा आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या मोहमद अब्दुल सत्तार या व्यक्तीने अपलोड केलेला आहे. या व्हिडिओद्वारे चुकीची माहिती पसरली त्यामुळे कुकटपालन उद्योगाचं मोठं नुकसान झालं. हा व्हिडिओ त्यांनी का अपलोड केला त्यांच्या मागे काहीजण आहेत का? याच शोध घेणं सुरू आहे.
 
यावेळी, जमावबंदीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिसवे म्हणाले, पुण्यात कोणत्याही प्रकारचा जमावबंदी, संचारबंदी आदेश दिलेला नाही. सदर आदेश काढणे अधिकार मला असून अद्याप आदेश पारित करण्याबाबत विचार नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेत वर्णी