Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी मोदींना मागे टाकले

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी मोदींना मागे टाकले
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर काट्याची होती. या दरम्यान मतदान ते परिणामापर्यंत गूगलवर देखील लोकं निरंतर सर्च करत होते. या दरम्यान सर्वांचा डोळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुंकार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर होता. आपल्या जाणून हैराणी होईल की मध्यप्रदेश- छत्तीसगड येथील लोकांनी मोदींच्या तुलनेत राहुल गांधींना अधिक सर्च केले. चला जाणून घ्या की या व्यतिरिक्त कोणते नेते अधिक सर्च केले गेले ते:
 
गूगल ट्रेड्सप्रमाणे या दरम्यान भाजपहून अधिक काँग्रेसला गूगलवर सर्च केले गेले. या दरम्यान लोकांनी मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडमध्ये डॉ. रमण सिंह आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्याबद्दल सर्चिंग केली, जेव्हाकि राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी बरोबरीने सर्च केले गेले. तसेच दुसरीकडे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील लोकांनी मोदींपेक्षा राहुल गांधी यांना अधिक सर्च केले आणि या प्रकारे राहुल गांधींनी मोदींना मागे टाकले.
 
मध्य प्रदेशामध्ये 28 नोव्हेंबर रोजी वोटिंग झाली होती. 28 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत 12 दिवसात गूगलवर लोकांनी भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक सर्च केले. 28 नोव्हेंबरला काँग्रेसला 100 अंक आणि भाजपला 91 अंक मिळाले होते, जेव्हाकि 9 डिसेंबरला काँग्रेसला 54 अंक तर भाजपला 46 अंक मिळाले होते. या दरम्यान गूगलवर शिवराज सिंह चौहान लाइटमध्ये होते. 28 नोव्हेंबरला शिवराज सिंह यांना 53, ज्योतिरादित्य सिंधिया यांना 15 आणि कमलनाथ यांना 7 प्वॉइंट्स मिळाले होते जेव्हाकि 9 डिसेंबरला शिवराज यांना 23, ज्योतिरादित्य सिंधिया यांना 9 आणि कमलनाथ यांना 4 अंक मिळाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर