महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आरएसएसच्या कार्यकर्त्याने भिवंडीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या १२ जून रोजी भिवंडी कोर्टात येणार आहेत.
राहुल गांधी १२ जून रोजी सकाळी ११ वाजता भिवंडी कोर्टात हजर राहणार असून त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हेदेखील असणार आहेत. सुनावणीनंतर ते पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांची भेट घेणार आहेत. मे महिन्यातच राहुल गांधी यांना १२ जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश भिवंडी कोर्टाने दिले हेते. आरोपनिश्चिती करण्याआधी राहुल गांधी यांचे म्हणणे रेकॉर्ड करून घ्यायचे असल्याचे कोर्टाने म्हटले होते.