Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होय मी पप्पू आहे, असे म्हणत राहुल यांनी मारला डोळा

होय मी पप्पू आहे, असे म्हणत राहुल यांनी मारला डोळा
अविश्वास प्रस्तावावर चर्चा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण हंगामेदार होतं. त्यांच्या भाषणावर अनेकदा सदनात हसण्याची आवाज गुंजली. पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरले नाही.
 
या दरम्यान राहुल गांधी यांनी भाजप आणि संघ कुटुंबावर टीका करत म्हटले की आपल्यासाठी मी पप्पू असेन पण माझा आपल्यावर राग नाही. मी भाजप आणि आरएसएसचा आभारी आहे ज्यांनी मला भारतीय आणि हिंदू असल्याचा अर्थ समजावला.
 
आलिंगन: भाषण संपल्यावर ते सरळ मोदींच्या सीटजवळ गेले आणि त्यांना आलिंगन दिलं व हात मिळवला. एकदा तर मोदींची मुद्रा अशी जाणवत होती की काय करत आहे कळेना असं वाटलं.
 
या भडकल्या: इकडे राहुल यांच्या आलिंगनावर अकाली दल खासदार आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर नाराज झाली. त्यांनी राहुल यांच्यावर टीक करत म्हटले की ही संसद आहे, मुन्ना भाईचा पप्पी झप्पी एरिया नव्हे.
 
राहुल ने डोळा मारला: या सर्व प्रकरणानंतर राहुल स्वत:च्या सीटवर बसले आणि आपल्या इतर सहयोगींकडे बघून डोळा मारला. आपले काम झाले, असा त्यांचा आशय असावा. कारण त्यांच्या भाषणावर खूप हल्ला झाला.
 
मनोरंजक भाषण: राहुल गांधी यांनी भाषण दरम्यान म्हटले की मी चांगला बोललो हे मला भाजप नेते स्वत: म्हणाले. दुसरीकडे भाजपने राहुल यांच्या भाषणावर कटाक्ष करत म्हटले की राहुल यांचे भाषण मनोरंजक होते. मनोरंजनासाठी त्यांचं जितके कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारवर शिवसेनेचा अविश्वासच सामनातून जोरदार टीका