राजकीय आयुष्यात मला माझ्या योग्यतेपेक्षा खूप अधिक मिळाले. त्यामुळे मी कोणत्याही शर्यतीत नाही. पंतप्रधानपदाच्याही नाही, असे केंद्रीय रस्ते व परिवहनंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
मोदी सरकारला चार वर्षें पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूीवर एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळल्यास सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिले जात असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर अच्छे दिनबद्दलचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. ही संकल्पना व्यक्तिनिहाय बदलते. लोकांच्या अपेक्षा सतत वाढत असतात. मात्र, भूतकाळातील कारभार आणि सध्या सरकारची कामगिरी याची तुलना केल्यास फरक सहज लक्षात येतो, असे गडकरी म्हणाले.
'मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. मंत्री म्हणून मी खूप समाधानी आहे. मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा नाही,' असं त्यांनी सांगितलं.