Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार नाही : गडकरी

nitin gadkari
मुंबई , शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (11:26 IST)
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणात परतण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. माझा दिल्लीत चांगला जम  बसला आहे आणि आता मला महाराष्ट्रात परतायचे नाही, असे गडकरी म्हणाले.
 
महाराष्ट्रात नेतृत्वबदलाची शक्यता असून देवेंद्र फडणवीस यांच्या जागी गडकरी यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू असल्याची चर्चा सातत्याने असते. यावर गडकरी यांनी  मुंबईतील एका कार्यक्रमावेळी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या १० मार्चपासून 'कासव महोत्सवा' चे आयोजन