Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साम, दाम, दंड व भेदचा अर्थ सर्व ताकद लावा

साम, दाम, दंड व भेदचा अर्थ सर्व ताकद लावा
मुंबई , बुधवार, 30 मे 2018 (11:38 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू केंद्रीय परिवहनंत्री नितीन गडकरी यांनी सावरून घेतली आहे. देवेंद्रांना मी लहानपणापासून ओळखतो. ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्या साम, दाम, दंड व भेदचा अर्थ सर्व ताकद लावा असा होतो, असे गडकरी यांनी सांगितले.
 
केंद्र सरकारला चार वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना-भाजपमध्ये सध्या आलेल्या कमालीच्या कटुतेनंतरही गडकरी यांनी युती टिकावी, अशी भावना व्यक्त केली. सेना-भाजपची स्थिती 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशी आहे. आमची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. 
 
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. याबाबत विचारले असता हा वाद अनाठायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज यांचा वाढदिवस, मनसेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत