Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रशियाच्या भारतातील राजदूताचे निधन

रशियाच्या भारतातील राजदूताचे निधन
नवी दिल्ली , शनिवार, 28 जानेवारी 2017 (11:46 IST)
रशियाचे भारतामधील राजदूत अॅलेक्झांडर कदा‍किन यांचे काल सकाळ हृदयविकाराच्या झटक्याने निधक झाले. ते 68 वर्षांचे होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूपयांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. कदाकिन यांच्या रूपाने भारताने आज भारत व रशियामधील द्विपक्षीय संबंधांना गेली काही दशके आकार देणारा ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी गमावला आहे. अशा शब्दांत स्वरूप यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कदाकिन हे 2009 पासून रशियाचे भारतामधील राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळात होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युती तोडणे ही शिवसेनेची कमजोरी