Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रॉ अधिकाऱ्याची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

रॉ अधिकाऱ्याची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
, सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (23:48 IST)
दिल्लीच्या लोधी कॉलनीतील नॅशनल इंटेलिजेंस एजन्सी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) च्या एका अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर लोधी कॉलनी पोलिसांनी त्यांना  जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी  मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सुरक्षित ठेवला आहे. हे अधिकारी बराच काळ तणावाखाली वावरत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अनिकेत कुमार रॉमध्ये तैनात होते. ते  मूळचे  ओरिसातील कटकचे  रहिवासी होते . सोमवारी सकाळी अनिकेत  कार्यालयात पोहोचले  . त्यांचे कार्यालय 10 व्या मजल्यावर आहे, कार्यालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांनी कार्यालयाच्या खिडकीतून उडी मारली. आवाज ऐकून त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
 
पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले, तेथे त्यांचा  मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, रॉ अधिकारी अनिकेत कुमार कौटुंबिक कारणांमुळे बराच काळ मानसिक तणावाखाली होते . मात्र, या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विनयभंग म्हणजे नेमकं काय? गुन्हा सिद्ध झाल्यास किती शिक्षा होते?