कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (आयसीएसई) व बारावीचा (आयएससी) निकाल आज जाहिर करण्यात आला. मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेची जुही कजारिया व पंजाबच्या मुक्तसरमधील विद्यार्थी मनहर बन्सल या दोघांनी ९९.६० टक्के गुण मिळवीत आयसीएसई १० वी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला.
आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलची फोरम संजनवाला, गुंडेचा एज्युकेशन अॅकॅडमीची अनुश्री चौधरी, चिल्ड्रन्स अॅकॅडमीची अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचा यश भन्साळी या चौघांनी ९९.४० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. तर ९९.२० टक्के गुण मिळवत मुंबईतील द कॅथेड्रल अॅण्ड जॉन कॅनॉन स्कूलचा वीर बन्सल, जमनाबाई नरसी स्कूलचा जुगल पटेल, मानेकजी कुपर एज्युकेशन ट्रस्टचा करण अंद्रादे, विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, रायन इंटरनॅशनल स्कूलचा हुसैन बसराई, बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा अमन झवेरी, पी.जी. गरोडीया स्कूलचा हर्ष व्होरा आणि ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडे आणि आदित्य वाकचौरे हे नऊ जण देशात तिसरे (पान १ वरून) आले. देश व परदेशातील आयसीएसई दहावी निकाल ९८.५४ टक्के लागला आहे. त्यामध्ये महाराष्टाचा निकाल सरस असून महाराष्टातून दहावीचा निकाल ९९.८५ टक्के इतका विक्रमी लागला आहे. यंदा आयसीएसई १० वीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे.