Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

रा.स्व.संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम साधेपणाने

RSS on vijayadashami
विजयादशमीच्या अगदी एक दिवस आधी मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील पादचारी पूलावरील अपघाताची घटना संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात विजयादशमीनिमित्ताने होणारे आपले सर्व कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साधेपणाने करणार आहे. राष्ट्रीय  स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत तीव्र दु:ख व्यक्त करीत असून या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात संघाचे स्वयंसेवक सहभागी आहेत.
 
विजयादशमी या संघाच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी ठिकठिकाणी संचलन आणि प्रकट उत्सव आयोजित करण्यात येतो. मात्र या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हे दसऱ्याचे कार्यक्रम व संचलन अत्यंत साधेपणाने काढण्यात येणार आहेत. संचलनाचे स्वागत करणारे फलक, रांगोळ्या, पुष्पवृष्टी, घोषणा आदी बाबी टाळण्यात येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींना शत्रुघ्न सिन्हा यांचे आव्हान