Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाळेतील शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षकाला अटक

arrest
, शनिवार, 21 डिसेंबर 2024 (18:45 IST)
झारखंडच्या रामगड जिल्ह्यात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेलेली असताना घडली आहे. या प्रकरणी शाळेतील 40 वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. 

12 वर्षांच्या मुलीच्या पालकांनी शुक्रवारी एफआयआर दाखल केला आणि आरोपीला संध्याकाळीच अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर घटना 17 डिसेंबर रोजी भदाणीनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका सरकारी शाळेत घडली दुपारच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थिनी शौचालयात गेली असता ही घटना घडल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे शिक्षकाने मुलीचा विनयभंग करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अल्पवयीन मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंदिर-मशीद मुद्द्यावर संजय राऊत यांनी दिले मोठे विधान, मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला