Lal Krishna Advani News: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. रात्री त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार लालकृष्ण अडवाणी गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. गेल्या 4 ते 5 महिन्यांत लालकृष्ण अडवाणी यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे अनेक बडे नेते अडवाणींना त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि याआधी मार्च महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा भारत सन्मान केला होता. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूही उपस्थित होते. आणि अडवाणींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik