कानपूरच्या तरुणा मध्ये आणि इंदूरच्या तरुणा मध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. कानपूरच्या तरुणाने इंदूरच्या तरुणा समोर अट ठेवली की जर त्याने लिंग परिवर्तित केले तरच तो त्याच्याशी लग्न करणार.
इंदूरच्या तरुणा ने प्रेमा खातर त्याच्या वर विश्वास ठेवत 1 कोटी रुपये खर्च करून लिंग परिवर्तन करून मुलगी बनला मात्र कानपूरच्या तरुणाने तुला मुलं होणार नाही म्हणत लग्नासाठी नकार देत त्याला धोका दिला.कानपूरच्या तरुणाने लग्नाला नकार दिल्यानंतर इंदूरचा तरुण संतापला आणि आपल्या मित्रासह कानपुर ला गेला आणि त्याने कानपूरच्या तरुणाच्या घराच्या बाहेर उभ्या कारला पेटवले.
त्याने विचार केला की कानपूरच्या तरुणाचे संपूर्ण कुटुंब या आगीत होरपळणार. मात्र तसे होऊ शकले नाही. आग लागल्यावर समजल्यावर जवळच्या लोकांनी आगीवर पाणी टाकून आग विझवली. नंतर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना ओळखले आणि पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांनी आरोपी इंदूरच्या तरुणा आणि त्याच्या मित्राला अटक केली असून इंदूरच्या तरुणाने एक पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांना सांगितले की कानपूरच्या तरुणाने एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली असून आता त्याने माझी फसवणूक केली असून तो फरार आहे. सम्पूर्ण दोष माझ्यावर टाकत आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी इंदूरचा तरुण करत आहे. पोलिसांनी त्याला महिला हेल्प डेस्कच्या खोलीत डांबून ठेवले आहे.