Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

18 वर्षाखालील पतीसोबत शारिरीक संबध हा बलात्कार

Sex With Wife Below 18 Is Rape
वयाने लहान असलेल्या आणि १८ वर्षा खालील मुलीसोबत आणि तेही लग्न करत ठेवलेले शारिरीक सबंध हे बलात्कारच आहे तो गुन्हा धरला जाणार आहे असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे स्वार्थासाठी १८ वर्षाखालील मुली सोबत आता शारिरीक सबंध ठेवता येणार नाहीत तो गुन्हा असणार आहे.
 
आपल्या देशात असलेल्या कायदा आणि पति-पत्नीमधील  शारीरिक संबंधांसाठीचे वय वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.  सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. यामध्ये   केंद्र सरकारने आपले मत देतांना सांगितले आहे की  बालविवाह हे भारतातील एक सत्य आहे. त्यामुळे  विवाहसंस्थेचे रक्षण झाले पाहिजेअसे मत दिले आहे. मात्र यावर न्यायालयाने वेगळी भूमिका घेतली आहे.
 
न्यायालय म्हणते की  15 ते 18 वर्षांपर्यंतच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवणे हा सुद्धा भारतीय दंडविधानानुसार दंडनीय अपराध आहे. त्यामुळे कायदा वाकवून जर कोणी बालविवाह करत असेल ते  चिंताजनक आहे. सामाजिक न्यायासाठी ज्या भावनेने कायदे बनवण्यात आले होते. त्या भावनेने त्यांची अमलबजावणी झाली नाही अशी विवशता न्यायालयाने व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप निवडणुकांचा पोरखेळ करत आहे - सुप्रिया सुळे