Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरियाणा लाठीचार्ज : पवारांचा निषेध

हरियाणा लाठीचार्ज : पवारांचा निषेध
, शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (21:55 IST)
शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरियाणामध्ये पोलिसांकडून शेतकर्यांदवर झालेल्या जबरजस्त लाठीचार्जमुळे वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हरियाणा पोलिसांच्या या करावाईवरून आता केंद्र सरकारच्या विरोधकांकडून पुन्हा एकदा टीका सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या घटनेचा निषेध नोंदवल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 
 
‍हरियाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकर्यांसवर केलेला क्रूर लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य आहे. शेतकर्यांनकडून शांततेत विरोध केला जात असतानाही, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि परिणामी अनेक शेतकरी जखमी झाले. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली असून, या घटनेचा निषेध नोंदवला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका