नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतक-यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व जिल्हा बँकांना समान स्वरुपात रकमेचे वाटप होईल, याची काळजीची घेण्याचा सल्लाही नाबार्ड आणि आरबीआयला देण्यात आला आहे. सोबतच रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकर्ज आणि इतर गोष्टी नाबार्डच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे.