Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मर्डर'च्या 6 महिन्यानंतरही जिवंत होती शीना बोरा: इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

Sheena Bora Murder Case
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (12:24 IST)
शीना बोरा हत्याकांडातील (Sheena Bora Murder) आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जामीन अर्जाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टात खळबळजनक दावा केला. इंद्राणीने दावा केला की 24 एप्रिल 2012 रोजी शीनाच्या हत्येच्या सहा महिन्यांनंतरही ती जीवंत होती आणि ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत अर्थात राहुल मुखर्जीसोबत होती.
 
इंद्राणीने सुनावणीच्या वेळी कोर्टात राहुलच्या कॉल डेटा रेकॉर्डचा हवाला दिला. राहुल आणि शीना यांच्यात 27 आणि 28 सप्टेंबर पर्यंत टेक्सट मेसेजद्वारे संभाषणही झाले. इंद्राणीने कोर्टात राहुल आणि शीना यांच्यात झालेले संवाद वाचून दाखवले. राहुल मुखर्जीने लिहिले होते- बाबा आयएम इन द कार पार्क. कम न. यावर शीनाने रिप्लाय केला- 5 मिनिट बस. नंतर राहुलने एक आणखी मेसेज केला- ए चल लवकर.
 
इंद्राणीने म्हटलं की मला जाणूनबुजून यात अडकवलं जात आहे. मी निरापराध आहे. ऑगस्ट 2015 मध्ये मला अटक झाल्यानंतर लगेच पीटर मुखर्जीनं त्याच्या खात्यातून माझ्या आणि त्याच्या दोन्ही मुलांच्या खात्यात सहा कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. एप्रिल 2012 मध्ये शीनाच्या कथित हत्येनंतर ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या अटकेपूर्वी तिनं 19 वेळा भारतात आणि देशाबाहेर प्रवास केला. जर मी गुन्हा केला असता तर, मी परतली असते का? असं इंद्राणी म्हणाली. 
 
उल्लेखनीय आहे की या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याला मुंबई हायकोर्टानं 6 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला होता. इंद्राणी मुखर्जी हिनं पाचव्यांदा जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी तिनं हा दावा करून खळबळ उडवून दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Falster 3 स्मार्टवॉच भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फि‍चर्स