पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका

शनिवार, 21 मार्च 2020 (09:23 IST)
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी याची शुक्रवारी जामिनावर सुटका करण्यात आली. जवळपास चार वर्षांनी पीटर मुखर्जी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडले. मुंबई हायकोर्टाने ६ फेब्रुवारी रोजी मुखर्जी याला सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करता यावे, यासाठी त्या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली होती.
 
मात्र, यानंतरही सीबीआयने या निर्णयाविरोधात अपील न केल्याने पीटर मुखर्जी यांना जामिनावर सोडण्यात आले. परंतु, न्यायालयाने त्यांना काही अटी घातल्या आहेत. त्यांचा पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्यात आला आहे. तसेच खटल्यातील अन्य साक्षीदारांशी संपर्क साधण्यास मुखर्जी यांना मनाई करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वसुंधरा राजे स्वत:ला आयसोलेट केले