काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर : शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिले तिकीट

गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (09:19 IST)
मध्य प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 29 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी काँग्रेसने मंगळवारी तिसरी यादी जाहीर केली होती, ज्यात 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा होती. तर दुसर यादीत 16 आणि पहिल्या यादीत 155 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.
 
काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मेहुणा संजय सिंह याला वारसिवनी तदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर इतर दोन उमेदवारांचे मतदारसंघ बदलण्यात आले आहेत. बुधवारी जारी करण्यात आलेल्या नावांध्ये एकूण 29 नावांचा सावेश आहे. काँग्रेसकडून अजून 22 नावांची घोषणा करण्याचे बाकी आहे. काँग्रेस उा त्या 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. 
 
शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसध्ये प्रवेश केला. 
 
संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली होती.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख राज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला : अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?