Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कलियुगातील श्रावण बाळांनी आई वडिलांना कावडीच्या बसवून प्रवास घडवला

कलियुगातील श्रावण बाळांनी आई वडिलांना कावडीच्या बसवून प्रवास घडवला
, शुक्रवार, 21 जुलै 2023 (14:00 IST)
social media
सध्या श्रावणाचा महिना सुरु आहे. या संपूर्ण महिन्यात उपवास केले जातात.अनेक जण तीर्थक्षेत्री जातात. व्रत वैकल्य करतात.आजच्या काळात तीर्थक्षेत्री जाण्यासाठी अनेक साधन उपलब्ध आहे. ज्यांचा उपयोग करून भाविक तीर्थक्षेत्री जाऊ शकतात. पूर्वीच्या काळी तीर्थक्षेत्री जाण्यासाठी कोणतीही साधने नव्हती.

त्रेतायुगात आपल्या अंध आणि वृद्ध पालकांना कावडीत बसवून बाळ श्रवण कुमार ने तीर्थक्षेत्री नेले. आणि पालकांची इच्छा पूर्ण केली. आजच्या काळात असे श्रावण बाळ मिळणे अशक्य आहे. पण आजच्या कलियुगात देखील आपल्या वृद्ध पालकांना कावडात बसवून तीर्थक्षेत्री नेणारे मुले देखील आहे. हे एक दोन नव्हे तर तीन मुले आहे ज्यांनी आपल्या वृद्ध पालकांना कावड मध्ये बसवून नेले. 
 
श्रवणकुमार होण्यासाठी त्रेतायुगाची गरज नाही. आजही अंत:करणात अपार श्रद्धा असलेली मुलं आपल्या आई-वडिलांसाठी श्रावणकुमारच दिसतात. अशाच एका मातापित्याची तीन मुले श्रवणकुमारच्या रूपाने दिसली . दोरीच्या साहाय्याने बांबूच्या दोन्ही बाजूस कावड बांधून त्यात आई-वडिलांना बसवून हे तीन तरुण सासनी येथील विलेश्‍वर धाम मंदिरात भगवान शंकराचा गंगाजलाने अभिषेक करण्यासाठी नेले आहे. 
 
उत्तरप्रदेशातील हाथरसच्या हरिनगर कॉलनीमध्ये बदनसिंह बघेल आपली पत्नी अनारदेवी आणि 3 मुलांसोबत राहतात. बदनसिंह नेत्रहीन आहेत. त्यांना अनेक दिवसांपासून गंगास्नान करण्याची इच्छा होती. त्यांनी आपली ही इच्छा आपल्या मुलांसमोर व्यक्त केली. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या तिन्ही मुलांनी त्यांना रामघाट गंगेत स्नान करण्यासाठी नेले.

गंगेत स्नान केल्यानंतर तिन्ही पुत्रांनी रामघाटावरून कंवर खांद्यावर आणि आई-वडिलांना खाटांवर बांधून सासनी नगरातील विलेश्‍वर धाम मंदिरात नेले. या तिन्ही मुलांनी आपल्या आई वडिलांना कावड  मध्ये बसवून तब्बल 150 किलोमीटरचे अंतर  गाठले. रस्त्यात त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 
सासनीत पोहोचण्यापूर्वी तिथे पोलीस उपस्थित होते. सासनी पोहोचून त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांनीं भगवान शंकराचे अभिषेक केले. 
 
त्यांच्या सोबत त्यांच्या दोघी सुना उर्मिला आणि रुबी बघेलही तिथे होत्या. बदन सिंग यांचा नातूही त्यांच्यासोबत आहे. वाटेत त्यांना कोणी पाहिलं तर तिन्ही तरुणांची आई-वडिलांप्रती असलेली भक्ती पाहून भारावून गेला.
 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Monsoon Session: मणिपूर घटनेवरून विरोधकांचा सभात्याग