या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टसाठी मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी लॉकडाऊन दरम्यान 4 कोटी 60 लाखांची देणगी जमा झाली आहे. विविध देणगीदारांनी ही रक्कम राम मंदिर बांधण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा केली आहे. यासंदर्भात राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, पैशाअभावी राम मंदिर बांधण्यात कोणताही अडथळा येऊ नये आणि भव्य, दिव्य असं राम मंदिर बांधणे ही भाविकांची इच्छा आहे. म्हणूनच भक्त सतत दान देत आहेत.
राम मंदिराचे पुजारी म्हणाले की, ट्रस्ट खात्यातील देणगीची रक्कम सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे राम मंदिरासंदर्भात दिलेल्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मंदिराच्या बांधकामासाठी विश्वस्त स्थापन करण्यास सांगितले होते.