Tokyo Olympics : टोकियो ऑलिंपिक आजच्या दिवसाची सुरुवात भारताने जिंकून केली. भवानी देवीने ट्युनिशियाच्या बेन अझीझीचा पराभव करून विजय मिळविला. ऑलिंपिकमध्ये प्रथमच देशाने या खेळासाठी पात्रता दर्शविली आहे.
मीराबाई चानू यांची अतिरिक्त एसपी म्हणून नेमणूक
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू यांना मणिपूर सरकारने अतिरिक्त एसपी म्हणून नियुक्त केले आहे. तसेच जूडोपटू सुशीला देवी लिकांबम यांची उपनिरीक्षक एसआय पदावर पदोन्नती झाली आहे.
ऑलिंपिकची सर्वात कमी वयाची मेडलिस्ट बनली रेसा लील
13 वर्षीय ब्राझिलियन अॅ थलीट रेसा लीने स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि सर्वात कमी वयातील ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. शेवटच्या सामन्यात 13 वर्षे 330 दिवसांच्या मोमिजी आणि 13 वर्षाच्या लिलने चमक दाखविली. या दोघांनीही त्यांच्या खेळात जोरदार कामगिरी केली. पण शेवटी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर मोमीजीने सुवर्णपदक जिंकले.