Bengaluru News: बेंगळुरूमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
ALSO READ: बीड सरपंच हत्या प्रकरणात आता फडणवीस सरकारची मोठी कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा असून तो बेंगळुरूमध्ये रोजंदारीवर काम करतो. पीडित मुलगी देखील एका रोजंदारी कामगाराची मुलगी होती. आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 323, 324, 376 आणि 307 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO), 2012 च्या कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik