बेंगळुरू मध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार सदस्य त्यांच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळले. अनुप कुमार, राखी, आणि त्यांची 5 आणि 2 वर्षांची मुलांचे मृतदेह सापडले आहे. आज सकाळी हे जोडपे घरात लटकलेल्या अवस्थतेत आढळले. कुटुंबाच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.
हे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी होते. हे कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून बंगळुरात भाड्याच्या घरात राहत होते. मयत अनुप कुमार हे एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून काम करायचे. मृतांच्या कुटुंबाला ही माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी हे जोडपे घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. अनूप आणि राखी यांनी एकतर विष प्राशन केले किंवा त्यांच्या मुलांचा गळा दाबला आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाऊलामागे आर्थिक व्यवहार हे एक कारण होते. असे सांगण्यात येत आहे की अनुप कुमारने एखाद्याला व्यवसाय किंवा जमिनीच्या व्यवहारासाठी पैसे दिले होते, परंतु त्यांची फसवणूक झाली. याबाबत त्यांनी आपल्या भावाला ईमेलही लिहिला आहे. मात्र, याची पुष्टी होणे बाकी आहे.घटनेचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.सध्या गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.