Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला

don't use WhatsApp
नवी दिल्ली , मंगळवार, 19 जानेवारी 2021 (14:08 IST)
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्‌सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत दाखल याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजरची गोपनीयता भंग होते, त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. गोपनीता भंग होत असेल, तर व्हॉट्‌सअॅवप वापरू नका, असा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
 
सुनावणीदरम्यान कोर्टाने फेसबुक आणि व्हॉट्‌सअॅपविरोधात नोटीस जारी करण्यास नकार दिला. या प्रकरणी सविस्तर सुनावणीची आवश्यकता असल्याचे उच्च न्यायालयाने यवेळी स्पष्ट केले. त्यामुळे 25 जानेवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी भारतीय