Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

सोमय्या नागरिकांच्या प्रश्नावर हादरले, राग काढला फेरीवाल्यावर

सोमय्या नागरिकांच्या प्रश्नावर हादरले, राग काढला फेरीवाल्यावर
, सोमवार, 21 मे 2018 (08:38 IST)

भाजप खासदार मुलुंड पूर्वेकडील संभाजी मैदानाजवळ फेरीवाल्याकडून पैसे हिसकावून ते फाडून टाकत तेच पैसे त्याच्या तोंडावर फेकले आहेत. तर त्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव आणून भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सचिन खरात याच्याकडून १२०० रुपये दंड वसूल करायला लावला आहे. या गुंडगिरीविरोधात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि  नवघर पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करायला लावला आहे. या प्रकरणात जनसंपर्क अभियानामध्ये विविध समस्यांवर नागरिकांनी सोमय्या यांना प्रश्न विचारून हैराण केले होते,  त्यांना उत्तरे आली नाहीत मग  हा राग त्यांनी फेरीवाल्यावर काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. मुलुंड पूर्वेकडील संभाजी मैदानाचे क्राँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. येथील स्थानिक नागरिकांनी मात्र या कामाला विरोध केला आहे. यासंदर्बात चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जनसंपर्क अभियानातंर्गत रविवारी सकाळी या मैदानात स्थानिकांची बैठक बोालविली होती.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्याला प्रियांका चोप्राची हजेरी