उत्तर प्रदेश येथील आग्रातून एका 8 वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. जवळपास आठवड्याभरापूर्वी मुलीला कुत्रा चावला होता.
8 वर्षांची चिमुकली किराणा दुकानात जात असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर मुलीने लगेचच तिच्या आई-वडिलांना कुत्र्याच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. तरीही तिच्या घरच्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले नाही. डॉक्टरांनी म्हटलं आहे की, कुत्र्याने हल्ला केल्यानंतर मुलीला लगेचच अँटी-रेबीज लस (एआरवी) देण्यात आली नाही. त्यानंतर रविवारी तिची प्रकृती जास्त बिघडली. तेव्हा तिला आरोग्य केंद्रात नेण्यात गेले. मात्र, मुलीची अवस्था नाजूक होती. त्यामुळं डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मुलीच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.