खासगी वेबपोर्टलवर विक्रीसाठी असणाऱ्या महागड्या मोटारसायकल व रेसिंग बाईक टेस्ट राईडच्या नावाखाली घेऊन पळून जाणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाला पुणे सायबर गुन्हे शाखेने पकडले़ आहे. या मुलाकडून साडेपाच लाखांच्या तीन सुपरबाईक जप्त केल्या आहेत़.
मुलगा अल्पवयीन असून तो दहावीचे शिक्षण घेत आहे. या मुलाला महागड्या, रेसिंग बाईक चालविण्याची आवड होती, त्यामुळे तो गाड्या चोरून त्या फिरवत असे. या प्रकरणातील फिर्यादीने यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये खासगी खरेदी विक्री पोर्टल असलेल्या ओएल एक्स वर मोटारसायकल विक्रीची जाहिरात दिली. अल्पवयीन मुलाने त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला मोटारसायकल खरेदी करायची असल्याचे सांगितले़ त्यांना कात्रज परिसरात भेटायला बोलावले़ होता. मोटारसायकल पाहिली आणि त्याला आवडली असल्याचे सांगून टेस्ट राईड घेऊन येतो, असे सांगितले मात्र तो गाडी घेऊन गेला तो परत आलाच नाही़. फिर्यादी यांना दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली़. याच प्रकारे आणखी दोन रेसिंग बाईक चोरीला गेल्याचे पोलिसांना लक्षात आले. सायबर गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला़ त्यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधलेल्या मुलाची माहिती पूर्ण तपासली आणि या मुलाने संबंधिताने बनावट खाते उघडून त्याद्वारे फिर्यादींशी चॅटिंग करत चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या अल्पवयीन मुलाची माहिती जमा केली आणि त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली त्याने तीनही गुन्हे केल्याची कबुली दिली व लपविलेल्या दुचाकी काढून दिल्या़ आहेत.