राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है ही मोहीम सुरु केली आणि त्याला उत्तर म्हणून मै भी चौकीदार भाजपने सुरु केले. देशात चौकीदार या शब्दाने चांगलेच रणकंदन माजले आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आपल्या नावासमोर चौकीदार हा शब्द लावला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांपासून ते मंत्र्यापर्यंत सर्वांनीच तसा बदल करत सर्वात चौकीदार हा शब्द लावला आहे. मात्र युतीचे मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र आपली भूमिका बदलली नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौकीदार मोहिमेपासून स्वतःला दूर ठेवले आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की, मी जन्मतः शिवसैनिक असल्याने मला चौकीदार होण्याची गरज नाही, स्पष्ट केले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेतली आहे, ती सामान मध्ये प्रकाशित होणार आहे.
उद्धव म्हणाले यात आपली भूमिका मांडत असून ते म्हणतात की, मी कायम शिवसैनिकच असणार असून, देश काँग्रेसमुक्त अभियानासाठी आपण काम करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे देण्याचे आम्ही ठरवले आहे. राम मंदिराच्या कामाला गती मिळाली नाही तर पुन्हा अयोध्येला जाईन. विरोधी पक्षात गेल्यानंतर सगळ्यांनाचा पंतप्रधान व्हायचं आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. त्यामुळे शिवसनेने अजूनही भाजपा विरोध कायम ठेवला आहे असे दिसते आहे.