सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा वाद अखेर मिटला आहे. सुप्रीम कोर्टाच्या बार काऊन्सिलच्या पुढाकाराने हा वाद मिटवण्यात यश आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या बार काऊन्सिलचे अॅटरनी जनरल मनन मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. न्यायाधीशांमधील सगळे वाद मिटले आहेत. सुप्रीम कोर्टाची कार्यवाही नेहमीप्रमाणे सुरू आहे, असे अॅटर्नी जनरल के के वेनुगोपाल यांनी सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती. प्रशासन योग्य काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशांनी अशी पत्रकार परिषद घेतली होती.