सेवा कराचा (जीएसटी), नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) चा फटका बसल्याने रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण झाली आहे असे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. यामध्ये नाइट फ्रँकने अहवाल दिला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जवळपास 3 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत असे अहवालात नमूद केले आहे. यामध्ये सर्वात जास्त घसरण पुण्यात झाली आहे. पुणे येथे 7 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत. दुसरा क्रमांक मुंबईचा असून येथे 5 टक्क्यांची घराच्या किंमती पडल्या आहेत. एनसीआरमध्ये जिथे आधीच गेल्या सहा वर्षांपासून किंमती खालावत आहेत तिथे 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामध्ये प्रमुख कारण जर पाहिले तर मागणीत झालेली घट आहे. देशातील प्रमुख शहरे असलेल्या बंगळुरु, एनसीआर दिल्ली आणि चेन्नईत घरांची विक्री अनुक्रमे 26 टक्के, 6 टक्के आणि 20 टक्क्यांनी घटली असून मुंबई आणि पुण्यात मात्र घरांच्या विक्रीत थोडीशी वाढ दिसून येतेय. या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात रेराची कायद्याची अत्यंत योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. ज्यामुळे मुंबई आणु पुण्यात घरांची विक्री अनुक्रमे 3 आणि 5 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे अजून अनेक दिवस किंमती पडणार आहेत. त्यामुळे ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे.