Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय?

मुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय?
, गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:28 IST)

मुंबईत वर्षभरात ४ हजार ७९० आगीच्या घटना घडल्यात. हे वाचून धक्का बसला ना? पण हीच मुंबईची सद्यस्थिती आहे. एकेकाळी पाण्याने वेढलेली मुंबई आता आगीचे केंद्र झाली आहे. कुर्ला येथे गोदामाला आग, मस्जिद रेल्वे स्थानकाजवळच्या झोपडपट्टीला लागलेली आग, काकडवाडी (गिरगाव) येथील दुकाने जळून खाक, सप्टेंबरमध्ये चेंबूरच्या आर. के. स्टुडिओला लागलेली आग, ऑक्टोबर महिन्यात जवाहरद्वीप व बुचर बेटांवरील तेलासाठ्यांना लागलेली महाकाय आग, नुकतीच झालेली साकीनाक्यातील भानू फरसाण कारखाना आणि परळच्या कमला मिल्समधील घटना ... अशा सरासरी रोज २ ते ३ ठिकाणी आगीच्या घटना दिसत आहेत. पण मुंबई म.न.पा. प्रशासन मात्र या बाबतीत ‘थंड’ दिसत आहे. आग लागल्यावर प्रशासन त्यांच्यावरील आरोप झटकण्यात धन्यता मानते. पण अशा आगी लागू नये किंवा या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. हे मुंबईकरांचे दुर्दैवच!


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्व आमदार बिनकामाचे, शिवरायांचा नावाचा राजकीय वापर- भिडे