Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

पाकिस्तानवर पुन्हा भारताचे सर्जिकल स्ट्राईक

surgical strike
, बुधवार, 27 डिसेंबर 2017 (09:29 IST)

आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात आपले तीन जवान शहीद झाले होते. त्यावर आपल्या लष्कराने लगेचच जशास तसे उत्तर दिले. भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी मध्येरात्री पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले. यात केलेल्या  कारवाईत पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले आहेत. आपल्या सैनिकांनी  पाकिस्तान येथील रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केला आणि त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या चार पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. यामध्ये शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले. आपल्या सैनिकांनी याच हल्ल्याचा हिशोब चुकता केला. भारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराने या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या. त्यामुळे आता पाकला पुन्हा एकदा चांगला धडा मिळाला आहे. जर पाक असे भ्याड हल्ले करत राहिला तर त्यांना नक्कीच मोठा धक्का भारत देऊ शकतो.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट