Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुग्णालयातूनही सुषमा स्वराज यांचे काम सुरु

रुग्णालयातूनही सुषमा स्वराज यांचे काम सुरु
, शनिवार, 3 डिसेंबर 2016 (17:23 IST)
गेल्या काही दिवसापासून दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे रुग्णालयातूनही काम सुरु आहे. रुग्णालयातूनच सुषमा स्वराज महत्वाच्या फाईल्स मंजूर करत असून चर्चादेखील करत आहेत. तर त्यांच्या जागी त्यांचे कनिष्ठ मंत्री परदेशी दौ-याची जबाबदारी पार पाडत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून सक्रिय असणा-या सुषमा स्वराज यांनी शनिवारी परदेशी महिलेवर झालेल्या बलात्काराची दखल घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परदेशी महिलेने केली बलात्कार झाल्याची तक्रार