Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताजमहालातून मिळते देशाला मिळते सर्वाधिक उत्त्पन्न

ताजमहालातून मिळते देशाला मिळते सर्वाधिक उत्त्पन्न
, बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:42 IST)
गेल्या काही दिवसांपासून ताजमहालवरून जोरादार राजकारण पेटल आहे. दुसरीकडे ताजमहाल हे देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या महसुलाच्या आकडेवारीवरून ही बाब सिद्ध झाली आहे. याशिवाय, गेल्यावर्षी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत सादर केलेली आकडेवारीही ताजमहालची लोकप्रियता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. ताजमहालात प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यानुसार ताजमहाल देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ ठरले आहे. या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून ताजमहालने २१.२३ कोटींची कमाई केली. त्यापाठोपाठ कमाईच्याबाबतीत आग्रा किल्ला ( १०.५८ कोटी), लाल किल्ला (५.९७४ कोटी) , हुमायूनची कबर ( ६.३५५५ कोटी) आणि कुतुबमिनार (१०.२९ कोटी) या पर्यटनस्थळांचा क्रमांक लागतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झारखंड : गायींसाठी हेल्थ कार्ड बनवणार