rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवासी बसची ट्रकशी भीषण टक्कर, दोन्ही वाहनांना आग लागल्याने १४ जण जिवंत जळाले

Accident, Kollam Accident, KSRTC bus accident in Kollam, അപകടം, കെഎസ്ആര്‍ടിസി ബസ് അപകടം, കൊല്ലത്ത് ബസ് അപകടം
एक प्रवासी बस आणि खडीने भरलेल्या टिपर ट्रकची जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांना आग लागली, ज्यात १४ प्रवासी जळून खाक झाले. अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील मार्कापूर जिल्ह्यातील रायवरमजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरला.  एक प्रवासी बस आणि खडीने भरलेल्या टिपर ट्रकची जोरदार टक्कर झाली. टक्कर होताच दोन्ही वाहनांना आग लागली, ज्यामुळे त्यातील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आग इतक्या वेगाने पसरली की बसच्या मागील भागात बसलेले प्रवासी आत अडकले. धूर आणि आगीच्या ज्वाळांमुळे गुदमरून आणि भाजल्याने चौदा जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने सुमारे डझनभर जखमींना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मार्कपुरमचे उपअधीक्षक (डीएसपी) नागराजू यांनी या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले, "या अपघातात सुमारे १४ जण जिवंत जळाले. आतापर्यंत डझनभर जखमींना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही मृतदेह अडकल्याची भीती असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे."
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर! १,००० कोंबड्यांची कत्तल, १४,००० अंडी पुरली