Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, मृत माणूस टॅक्सी चालवताना जिवंत सापडला!

Taxi
, सोमवार, 8 जानेवारी 2024 (14:54 IST)
युपीच्या बागपत परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या माणसाला मृत मानले गेले होते तो जीवित आढळला. दिल्ली पोलिसांनी त्याला टेक्सी चालवताना पकडले आहे. त्याची चौकशी केल्यावर त्याला एका महिला आणि चार मुलांसह राहण्याचे समजले. पोलिसांनी सांईगतले की ही व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून बेपत्ता होती. त्याचा शोध घेतल्यावरही तो सापडला नाही म्हणून त्याला मृत समजले गेले. हा व्यक्ती आता दिल्लीत राहतो याला एक बायको आणि चार मुले आहे आणि हा टेक्सी चालवतो.

याचे नाव योगेंद्र कुमार असून  हा व्यक्ती मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील बागपत येथील सिंघावली अहिरचा राहणारा आहे. हा वर्ष 2018 मध्ये बेपत्ता झाला होता. त्याच्यावर धमकी देण्याचे दुखापत करण्याचे गुन्हेगारीचे आरोप असून तो पसार झाला होता. त्याच्या शोध घेऊन देखील तो सापडला नसल्याने त्याला मृत समजले गेले. तो एका जुन्या प्रकरणात जमीन मिळवण्यासाठी कोर्टात आला होता त्यावेळी त्याचा पत्ता लागला.

तो दिल्लीत असल्याचे समजले त्याचा शोध घेतल्यावर त्याने आपली ओळख बदलली असून त्याने दुसरे लग्न केलं आहे आणि तो ओळख बदलून राहतो.टेक्सी चालवण्याचे काम करतो. त्याची चौकशी केल्यावर पोलिसांना त्याने सांगितले की गावातील वेदप्रकाशशी त्याचे चांगले संबंध नव्हते. त्याच्या मुळे तो दिल्लीत आला आणि त्याने लग्न केले आणि तिथेच राहू लागला. गावाकडे तो परत आला नसल्याने त्याचा खून झाला असावा असे कुटुंबियांना वाटले. आता पाच वर्षानंतर त्याचा शोध लागला.  
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Delhi: सुसाट कार मध्ये तरुणीचा डान्स, व्हिडीओ व्हायरल!