Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 16 March 2025
webdunia

वडोदरामध्ये मद्यधुंद चालकाने अनेक लोकांना चिरडले, व्हिडिओ व्हायरल

Vadodara Accident
, शनिवार, 15 मार्च 2025 (11:06 IST)
Vadodara accident news : गुजरात मधील अमरापली, कारेलिबाग येथे एका मद्यधुंद चालकाने अनेकांना चिरडल्याची बातमी समोर आली आहे. या भयानक अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चार गंभीर जखमी झाले आहे. तसेच अपघातात एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.
ALSO READ: सुवर्ण मंदिर मध्ये भाविकांवर रॉडने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार अपघात इतका गंभीर होता की कारची एअरबॅग देखील उघडली. अपघातानंतरही, तरुण इतका मद्यधुंद झाला होता की त्याने  रस्त्यावर आरडाओरडा करत गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ सध्या वायरल झाला आहे.  
ALSO READ: ठाण्यात होळी उत्सवादरम्यान किशोरवयीन मुलावर हल्ला
 तसेच डीसीपी पन्ना मोमाया म्हणाले की, अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जखमी झाले आहे, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारचालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख वाराणसी येथील रहिवासी रवीश चौरसिया अशी आहे. त्याच्याबरोबर एक मित्र देखील कारमध्ये बसला होता, जो अजून फरार आहे. त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली गेली आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याचे  पोलिसांनी सांगितले.
ALSO READ: पालघर: सूटकेसमध्ये महिलेचे डोके आढळले, उर्वरित शरीर गायब; पोलिसांनी तपास सुरू केला
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुवर्ण मंदिर मध्ये भाविकांवर रॉडने हल्ला