सध्या तेरे वास्ते फलक से मैं चाँद लाऊंगा अलीकडे हे गाणं तरुणांच्या ओठावर आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी चंद्र आणि तारे तोडून आणण्याचे म्हणतो. आणि तसे वचन देतो. मात्र हे प्रत्यक्षात होणे अशक्य आहे. पण एक पिताच असा व्यक्ती आहे जो आपल्या लेकीसाठी काहीही करू शकतो. आणि हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर शहरातील एका पिताने करून दाखवले आहे. व्यवसायाने वकील असणारे अमित शर्मा यांनी आपल्या मुलीसाठी तिच्या 18 व्या वाढदिवसाला चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
अमित शर्मा यांची मुलगी तनिषा शर्मा हिचा 8 ऑगस्ट रोजी 18 वा वाढदिवस आहे. अमित शर्मा यांनी वर्षभरापूर्वीच त्यांच्या लहान मुलीच्या वाढदिवसानिमित्त अवयवदान (organ donation) करण्याचा निर्णय घेतला होता. अवयवदानासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.आता या वर्षी त्यांनी लेकीसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने चक्क चंद्रावर 8 कनाल जमीन खरेदी केली आहे.
अमित शर्मा यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलीला एक खास भेट देण्याची इच्छा होती. चंद्र तारे आणण्याची कल्पना त्यांना चांगली वाटली आणि त्यांनी आपल्या लेकी तनिषासाठी चंद्र तारे जरी तोडत नसले तरी चंद्रावर तिथे तिचे घर नक्कीच असू शकते.
लॉस एंजेलिसच्या इंटरनॅशनल लूनर लँड अथॉरिटीच्या वतीने खरेदी केलेल्या जमिनीची कागदपत्रे अमित शर्मा यांनाही पाठवण्यात आली आहेत. अमित शर्मा यांची मुलगी तनिषा शर्मा चंदिगडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कोचिंग घेत आहे. तनिषाच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी एक अनोखी भेट दिली आहे. 18व्या वाढदिवसाला वडिलांकडून हे गिफ्ट मिळाल्याने मुलगी तनिषालाही खूप आनंद झाला आहे.