Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुके मांस, शिंगे, बिबट्या आणि हरणांची कवटी पाहून वनाधिकारी झाले थक्क, शिकारीला अटक

arrested
, सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (14:45 IST)
ओडिशा मधील मयूरभंज जिल्ह्यात वन अधिकारींनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून बिबट्याची कवटी तसेच एका हरणाची कवटी जप्त करण्यात आली आहे. सिमिलिपाल वाघ अभयारण्याचे उपसंचालक सम्राट गौडा यांनी माहिती दिली. 
 
एसटीआरचे डेप्युटी डायरेक्ट सम्राट गौडा हे म्हणाले की, एका गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकारी पथकाने रविवारी मकाबडी गावातील एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. तेथून बिबट्याची कवटी जप्त करण्यात आली. गौडा म्हणाले की, शिकारीला अटक करून चौकशी करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार चौकशीदरम्यान त्याने वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरली योजना देखील सांगितली.  अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून काही हाडे जप्त केली असून, ती वन्य प्राण्यांची असल्याचा संशय आहे.
 
आरोपीच्या मकाबडी येथील घरातून गुन्ह्यातील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दुसऱ्या झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून सुके मांस, तीन फासे, हरणाची कवटी, शिंगांसह कुऱ्हाड, फंदा, विष आणि दोन पिशव्या जप्त करण्यात आल्या. एसटीआरचे उपसंचालक म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरेंकडून विधानसभेसाठी 'या' 2 उमेदवारांची घोषणा, मनसेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई?