Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आळा घालण्यासाठी सरकारने तयार केले 5 पॉइंट प्लान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आळा घालण्यासाठी सरकारने तयार केले 5 पॉइंट प्लान
, रविवार, 28 मार्च 2021 (16:19 IST)
देशातील झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने पुन्हा एकदा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना लक्षात घेता केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पंजाब आणि दिल्ली यांचा समावेश होता. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा झाली.
बैठकीत कोरोनाला पराभूत करण्यासाठी 5-चरणांची रणनीती तयार केली गेली:
1- कोरोनाची वाढती घटना लक्षात घेता सरकारने सर्व राज्यांना कोरोना चाचणी वाढविण्यास सांगितले आहे.
2- कोरोना संक्रमित रूग्णांना वेगळे ठेवणे आणि कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात किती लोक आले आहेत हे बघणे .
3  - कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य कर्मचार्‍यांना पुन्हा प्रोत्साहित करणे जेणेकरुन ते पुन्हा कोरोना रूग्णांवर पूर्ण सामर्थ्याने उपचार करू शकतील.
4  कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना लक्षात घेता कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यासाठी लोकांना जागरूक करणे. मास्क  आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे   .
5  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये कोरोना लसीकरण वाढवले जेणे करून  जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसी दिल्या जावो.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सांगितले की कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत असे 46 जिल्ह्यांची त्यांनी ओळख केली आहे. या महिन्यात कोरोनाची नवीन प्रकरणे 71 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत, तर 69 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना येथील कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि लसीकरण मोहीम वेगवान करण्यास सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले