Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही :  नरेंद्र मोदी
, शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (16:38 IST)
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात संताप पसरला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला.  धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. 
 
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना रोखठोक इशारा दिला आहे. ''पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांची जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशाराच मोदी यांनी दिला. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेटमध्ये स्टेट बँकेचा मोठा भांडवली हिस्सा